महिला घरापेक्षा ऑफिसमध्ये जास्त आनंदीत असतात

1347

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती ही ताणतणावातून जात असते. त्यातही ऑफिसमधील ताणतणावामुळे अनेकजणांना ऑफिसपेक्षा घरी राहणे जास्त आवडते. पण यास महिला अपवाद असल्याचे समोर आले आहे. महिला घरापेक्षा ऑफिसमध्येच जास्त आनंदात असतात असे ‘पेन स्टेट युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

या संशोधनानुसार महिलांना घरापेक्षा ऑफिसमध्ये कमी तणाव जाणवतो. यामुळे त्या घरापेक्षा ऑफिसमधील कामात स्वत:ला जास्त गुंतवतात. यामुळे काहीकाळासाठी त्या घरातील ताणतणावातून मुक्त असतात. यासंदर्भात पेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सलग काही आठवडे 122 व्यक्तींवर संशोधन केले. यावेळी त्यांच्यात निर्माण होणाऱ्या कोर्टीसोल हार्मोन्सच्या स्तराची चाचणी करण्यात आली. त्याचबरोबर दिवसभरात त्यांच्या बदलणाऱ्या मूड्सवरही अभ्यास करण्यात आला. त्यावेळी महिला घरापेक्षा ऑफिसमध्ये जास्त आनंदात वेळ घालवत असल्याचे समोर आले.

तर दुसरीकडे महिलांच्या तुलनेत पुरुषांना ऑफिसमधील कामाचा सर्वाधिक ताण असतो. मनासारखे काम नसले तरी ते त्यांना करावे लागते यामुळे पुरुषांना ऑफिसमधून घरी केव्हा जातो असे होते. तर महिलांना जर मनासारखे काम करता येत नसेल तर त्या लगेच नोकरी सोडून दुसऱ्या ठिकाणी नोकरी करू लागतात. पण पुरुष मात्र त्या त्तत्परतेने नोकरी सोडत नाहीत. त्यामुळे ते सतत तणावात असतात. असे या संशोधनात समोर आले. तसेच ज्या महिलांना मुलं असतात त्या अधिक आनंदी व प्रसन्न असतात. पण त्यांच्या तुलनेत मुलं नसलेल्या महिलांचे आयुष्य तणावात असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या