वुमन ऑफ इम्पॅक्ट या कार्यक्रमाचे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात समाजातील इतर महिलांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणाऱ्या प्रभावशाली महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. रचना लचके-बागवे यांनी रचना आर्टस् अॅण्ड क्रिएशन्सतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत हा कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य असणार आहे.
कार्यक्रमात इंटरनॅशनल चेस मास्टर पद्मश्री भाग्यश्री ठिपसे, फडके लॅबोरेटरीच्या संचालिका डॉ. वंदना फडके, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर, सीएनबीसी आवाजच्या संपादक हर्षदा सावंत, अभिनेत्री वैदेही परशुरामी, लाईफस्टाईल इन्फ्ल्युएन्सर इशा अगरवाल आदी महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला महिला व बाल संगोपन विकास मंत्री अदिती तटकरे, बॅगीटच्या संचालिका, संस्थापक नीना लेखी आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे आशीषकुमार चौहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.