लंपटगिरीला बधत नसलेल्या महिलेची दिव्यात मालगाडीखाली ढकलून हत्या, रेल्वे स्थानकात विकृताचे भयंकर कृत्य

पहाटे फलाटावर नसलेल्या गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेशी ल गट करणाऱ्या विकृताने तिची हत्या केल्याचा भयंकर प्रकार दिवा रेल्वे स्थानकात घडला. या महिलेने त्याच्या लंपटगिरीला विरोध केला म्हणून त्या विकृताने तिला थेट धावत्या माल गाडीखाली ढकलून दिले. या घटनेनंतर फलाटावर तैनात असलेल्या पोलि साने पाठलाग करून त्याच्यावर झडप घातली. राजन सिंग (39) असे या विकृताचे नाव असून त्याला न्यायाल याने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

दिवा रेल्वे स्थानकात एक प्रवासी महिला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक 5 आणि 6 च्या दरम्यान उभी होती. यावेळी राजन सिंग नावाचा विकृत इसम तिथे आला. त्याने या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला झिडकारले आणि ती तिथून जाऊ लागली. तेव्हा सिंग याने तिचा पाठलाग केला आणि तिच्याशी झटापट केली. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी ती धडपड करत होती. ही महिला बधत नसल्याचे पाहून सिंग याच्या संतापाचा पारा चढला आणि त्याने या महिलेला त्याच फलाटावरून धडाडत जाणाऱ्या मालगाडीखाली ढकलून तिची हत्या केली.

पाठलाग करून झडप
हा प्रकार सफाई कामगार तुळशीदास कामडी याने पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई सागर शिंदे यांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करत आरोपीवर झडप घातली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.