हरयाणात महिलेचा अल्पवयीन मुलावर बलात्कार, गुन्हा दाखल

4913

हरयाणात एका 29 वर्षाच्या महिलेने एका 14 वर्षाच्या मुलावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हरयणात एक महिला राहत होती. 10 वर्षापूर्वी तिच्या पतीचा करंट लागल्याने मृत्यू झाला होता. तेव्हा पासून हरयाणाच्या पलवल भागात राहत होती. तेव्हा तिची ओळख एका तरुणाशी झाली. या तरुणाचे महिलेच्या घरी येणे जाणे झाले. या काळात महिलेने तरुणाशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच तरुणाकडून लग्नाचे वचनही घेतले. नंतर काही दिवसांनी महिला गरोदर राहिली. तेव्हा तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. नंतर महिलेने तरुणाच्या विरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली. सदर तरुण हा अल्पवयीन असून त्याचे वय 14 वर्षे असल्याचे निष्पण्ण झाले.

पोलिसांनी पोस्को अंतर्गत महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अजून सदर महिलेला अटक करण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या