प्रियकराने प्रेयसीला लग्नाला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने प्रियकराचे गुप्तांगावर चाकूने हल्ला केला आहे. भिवंडीमध्ये ही घटना घडली असून प्रियकरावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भिवंडीत एका 31 वर्षीय तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसीने प्रियकराला लग्नाची मागणी घातली. पण प्रियकराला तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा नव्हती. म्हणून त्याने आपल्या प्रेयसीला नकार दिला. त्यामुळे प्रेयसीने धारदार चाकूने प्रियकराच्या गुप्तांगावर हल्ला केला. यात प्रियकर तरुण गंभीर जखमी झाला. त्याने तातडीने पळ काढला आणि रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर तरुणाने पोलिसांत आपल्या प्रेयसीविरोधात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पण कुठलीही अटक केलेली नाही.