… म्हणून हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघ मागे!

हिंदुस्थानचा पुरुषांचा क्रिकेट संघ आयपीएल संपल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन दौऱयावर रवाना झाला. मात्र आयपीएल आटोपल्यानंतर आपण कोणत्या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहोत याबाबत हिंदुस्थानी महिला संघाला काहीही माहीत नाही ही खेदजनक बाब.

एकीकडे ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ प्रगतिपथावर रूढ असताना हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघ मागे आहे. बीसीसीआयने महिला आयपीएलच्या आयोजनासाठी विलंब केलाय, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार व समालोचक लिसा स्थळेकर हिने.

हिंदुस्थानात कोरोना जास्त प्रमाणात आहे हे मान्य आहे, पण हिंदुस्थानी महिला खेळाडूंना आपण पुढे कोणत्या मालिकेत खेळणार आहोत हेदेखील माहीत नाही. म्हणून हा संघ मागे आहे. हिंदुस्थानात गुणवत्तेची कमी नाहीए, पण ही हेरायला हवी. यानंतरच हिंदुस्थानी महिला क्रिकेट जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवू शकते असे लिसा स्थळेकर हिला वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या