एकच लक्ष्य ‘वर्ल्ड कप जिंकायचाय’ ; महिला क्रिकेटपटू मिताली राजचे स्वप्न

439

वयाच्या 16व्या वर्षी पदार्पण… गेली 21 वर्षे अविरतपणे देशाची सेवा… महिला क्रिकेटमधील विविध विक्रम… ही सक्सेसफुल स्टोरी हिंदुस्थानी महिला संघाची महान क्रिकेटपटू मिताली राज हिची. याप्रसंगी वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झाले नसून आगामी दिवसांत हेच ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावीन, असे मिताली राजने म्हटले आहे.

पुढल्या वर्षी न्यूझीलंडमध्ये वन डे वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. आयसीसीकडून ही स्पर्धा अद्याप पुढे ढकलण्यात आलेली नाही. ती म्हणाली, हिंदुस्थानच्या महिला संघाने गेल्या काही काळात टी-20 व वन डे क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलीय. त्यामुळे पुढील वर्ल्ड कपमध्ये आम्हाला जिंकण्याची नक्कीच संधी असणार आहे, असे मितालीने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या