#WomensDay – खाणावळीत पोळ्या लाटणाऱ्या मुलीचा पीएसआयपर्यंतचा थक्क करणारा प्रवास

>> नवनाथ शिंदे

वडिलांनी आईपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्यावर मोठे संकट ओढावले होते. मात्र, आईच्या जिद्दीमुळे तिने सुरू केलेल्या खाणावळीत दररोज पोळ्या लाटून मदत करताना मी सरकारी नोकरी करण्याचा मनोमन निश्चय केला. त्यासाठी पोलीस भरतीच्या माध्यमातून प्रयत्नही सुरू केले. पंरतु, अवघ्या एका मार्काने पोलीस भरतीत निवडीपासून दूर राहिल्यामुळे निराश झाले होते. मात्र दोन वर्ष सतत जिद्दीने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करून यश प्राप्त केल्याचा अभिमान पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी संपत पाटील यांनी सांगितला आहे. पुण्यातील शुक्रवार पेठ पोलीस चौकीत त्या सध्या कार्यरत आहेत.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या असलेल्या तेजस्वी पाटील यांचा लहानपणापासूनच संघर्ष सुरू झाला. कौटुंबिक कारणांमुळे त्यांच्या वडिलांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अचानकपणे त्यांच्या आई शोभा पाटील यांच्यावर मुलांची जबाबदारी आली. दरम्यानच्या काळात संसाराचा गाडा चालविण्यासाठी त्यांनी घरातच खाणावळ सुरू केली. त्यावेळी तेजस्वी महाविद्यालयीन शिक्षण घेताना आईला मदतीचा हातभार लागावा म्हणून दररोज खाणीवळीसाठी लागणाऱ्या पोळ्या लाटण्यास मदत करीत होत्या. एकीकडे शिक्षण तर दुसरीकडे लढण्याची जिद्द अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागत होती. मुलांना शिक्षण देण्यासाठी तेजस्वी यांच्या आईची धडपड सुरूच होती. महाविद्यालयीन शिक्षण घेताना तेजस्वी यांनी 2010 मध्ये पोलीस भरतीसाठी प्रयत्न केला. मात्र, अवघ्या एका मार्काने त्यांची निवड होउ शकली नाही.

शिक्षकांच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासा सुरूवात केली. 2012 मध्ये राज्य सेवा परिक्षेत चांगल्या मार्कांने उत्तीर्ण होउन तेजस्वी यांनी आईच्या कष्टाचे चीज केले. खाणावळीसाठी पोळ्या लाटून मदत करणारी लेक अधिकारी झाल्याचा आनंद संपुर्ण इस्लामपूरवासियांना झाला होता. नाशिक पोलीस प्रशिक्षण वेंâद्रात प्रशिक्षण घेतल्यानंतर तेजस्वी यांची परिवक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक म्हणून गडचिरोलीला नियुक्ती करण्यात आली. शासनाकडून पहिल्यांदाच परिवक्षाधीन महिला पोलीस अधिकाNयांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. त्याठिकाणी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर गडचिरोली शहर पोलीस ठाण्यात काम करताना आदिवाशी महिलांच्या विविध समस्यांची सोडवणूक केली. विशेषतः महिलांमध्ये जनजागृती, विविध विषयांवरील कार्यशाळा, प्रबोधन करताना समाधान लाभले. सप्टेंबर 2019 पासून तेजस्वी पुण्यात कार्यरत आहेत. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाNया विद्याथ्र्यांनी लक्ष वेंâद्रित केल्यानंतरच यश मिळणार असल्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

सबळ पुराव्यांमुळे आरोपीला 10 दिवसांत शिक्षा

तरूणाने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यामध्ये 15 सप्टेंबर 2018 मध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांनी केला. त्यांनी आरोपीविरोधात न्यायालयामध्ये सबळ पुरावे सादर केले. त्यानुसार न्यायालयाने अवघ्या 10 दिवसात आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावास आणि 8 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. गडचिरोली जिल्ह्यात एवढ्या कमी वेळेत आरोपीला न्यायालयाने दिलेली शिक्षा चर्चेत होती.

आपली प्रतिक्रिया द्या