जागतिक महिलादिनानिमित्त राज्यभरात रणरागिणींचा सन्मान

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱया रणरागिणींचा आज जागतिक महिला दिनानिमित्त रज्यभरात ठिकठिकाणी विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून काम केलेल्या सफाई, आरोग्य क्षेत्रातील महिला कर्मचाऱयांना विविध पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

शिवसेना उपशाखाप्रमुख हरीश धारिया यांनी कल्पना कला पेंद्र, तुळसीवाडी येथे आयोजित केलेल्या समाजातील होतकरू महिलांच्या सन्मान सोहळ्याचे उद्घाटन कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्पप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिलांसाठी दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

केईएम रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱया नर्सेसना जागतिक महिला दिनानिमित्त केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर, शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते.

दहिसर येथे शिवसेना शाखा क्रमांक 1 च्या वतीने जागतिक  मनिकम्मा राजमुरी व  जेनिफर पॉल यांना ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या सन्मान सोहळय़ाला महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, माजी नगरसेवक, मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, सामाजिक कार्यकर्त्या योन्ने डिसोझा, महिला शाखा संघटक ज्यूडी मेंडोसा, डिलन क्वाड्रॉस आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या