
ओडिशाच्या सुंदरगड जिह्यातील कोइडा येथील बडबलीजोर गावात पार पडलेल्या एका आगळ्यावेगळ्या फुटबॉल सामन्याने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सामन्यात महिलांनी साडी नेसून मैदानात फुटबॉलचा थरार रंगवला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ओडिशाच्या माओवादग्रस्त पट्टय़ात मोडणाऱया या भागात महिलांनी केवळ सहभाग नोंदवला नाही, तर पूर्ण आत्मविश्वासाने खेळही केला. 25 ते 40 वयोगटातील या महिलांनी साडी नेसूनही ज्या चपळाईने मैदानात धाव घेतली, ते पाहून प्रेक्षक थक्क झाले. हा सामना केवळ मनोरंजनासाठी नव्हता तर स्त्राr-पुरुष समानता उपक्रमाचा भाग होता.






























































