
लाकूड किंवा अन्य धूर निर्माण करणारी इंधने हिंदुस्थानींची फुफ्फुसे खराब करत आहेत. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी ही धोक्याची घंटा वाजवली आहे. दरवर्षी जगभरात जैव इंधनाच्या ज्वलनामुळे 40 लाख लोक मृत्युमुखी पडत असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
उत्तर अमेरिकेतील रेडिओलॉजी सोसायटीच्या वार्षिक मीटिंगमध्ये नुकतेच काही महत्त्वाचे निष्कर्ष मांडण्यात आले. लाकूड, कोळसा यांसारख्या जैव इंधनाच्या ज्वलनाने मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण होतो. या धुरामधील प्रदूषणास कारणीभूत घटक आणि बॅक्टेरियल टॉक्सिन हे सरळ फुफ्फुसांपर्यंत पोचतं आणि फुफ्फुसांना नुकसान पोचवतं. हिंदुस्थानींवर करण्यात आलेल्या संशोधनातून ही गंभीर बाब उघड झाली आहे.
40 लाख लोकांचा मृत्यू
दरवर्षी जैव इंधनाच्या ज्वलनामुळे 40 लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत. कॅलिपहर्निया युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर अभिलाष किजकी म्हणतात, एकतर लोक लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. दुसरे म्हणजे धूरांमुळे त्यांचे फुफ्फुस खराब होत आहेत. जगभरातील 300 कोटी लोक या पद्धतीने अन्न शिजवत आहेत.
23 हिंदुस्थानींवर संशोधन
लोवा युनिव्हर्सिटीने या संशोधनासाठी 23 हिंदुस्थानींची निवड करण्यात आली. हे सर्वजण लाकडं जाळून अन्न शिजवतात. त्यांच्या घरातील प्रदूषणाची पातळी किती आहे आणि फुफ्फुसांची क्षमता जाणून घेण्यासाठी स्पायरोमेट्री टेस्ट करण्यात आली.
धुरांचे दुष्परिणाम कोणते?
- डॉक्टरांच्या मते, सतत प्रदूषित हवेमध्ये राहिल्यास फुफ्फुसे खराब होतात.
- अशा लोकांच्या फुफ्फुसांमध्ये हवा भरलेली होती. त्याला एयर ट्रकिंग म्हणतात.
- परिणामी फुफ्फुसांमध्ये हवा घेणे आणि बाहेर काढणे कठीण होते.


























































