युक्रेनमधील रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात तेलंगणातील कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युक्रेनमध्ये झालेल्या रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात तेलंगणातील स्थलांतरित कामगाराचा मृत्यू झाला. हल्ल्यात अन्य एक व्यक्ती जखमी झाला आहे. वाविलाला सुदर्शन गौड असे मयत कामगाराचे नाव आहे. युक्रेनमधील हिंदुस्थानी दूतावासाने या घटनेला दुजोरा देत गौड यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील 42 वर्षीय वाविलाला सुदर्शन गौड हा चार महिन्यांपूर्वी एका नातेवाईकासोबत रोजगाराच्या शोधात युक्रेनला गेला होता. तिथे तो बांधकाम क्षेत्रात काम करत होता. ओडेसा येथे हवाई हल्ल्याचा इशारा (एअर-रेड वॉर्निंग) मिळाल्यानंतर आपल्या राहत्या ठिकाणाहून बाहेर पडत असताना क्षेपणास्त्र हल्ल्यात गौड याचा मृत्यू झाला.