जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप; अमित पांघलचा सॉल्लिड पंच

385

हिंदुस्थानच्या अमित पांघलने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपची सुरुवात जबरदस्त केली. आशिया चॅम्पियन या पठ्ठय़ाने चीन तैपईच्या तू पो वेई याचा 5-0 अशा फरकाने धुव्वा उडवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

अमित पांघल हा आधी 49 किलो वजनी गटात खेळत होता. आता तो 52 किलो वजनी गटात आपली धमक दाखवत आहे. 23 वर्षीय अमित पांघल याला गेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीतच हार सहन करावी लागली होती. आर्मीमध्ये नोकरी करीत असलेल्या अमित पांघल याच्या दमदार पंचेससमोर शनिवारी झालेल्या लढतीत प्रतिस्पर्ध्याचा निभाव लागला नाही

आपली प्रतिक्रिया द्या