World cup 2019 : बांगलादेशचा इंडिजवर 7 विकेट्सने दणदणीत विजय

सामना ऑनलाईन । टॉटन

बांगलादेशने वेस्ट इंडीजचा 7 विकेट्स राखून दणदणीत पराभव केला. अष्टपैलू शकीबने नाबाद 126 तर लिट्टन दासने नाबाद 94 धावांची खेळी करत बांगलादेशला वर्ल्डकपमधील दुसरा विजय मिळवून दिला. बांगलादेशने 322 धावांच आव्हान 42 व्या षटकात पूर्ण केले. दरम्यान या पराभवामुळे इंडिजपुढील आव्हान वाढले आहे.

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील 23 वा सामना वेस्ट इंडिज आणि बांगलादेशमध्ये टॉटनमध्ये रंगला. बांगलादेशचा कर्णधार मुशरफे मोर्तजा याने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वेस्ट इंडीजने शाई होपच्या 96, ल्युईसच्या 70 आणि हेटमायरच्या 50 धावांच्या बळावर 50 षटकात 8 बाद 321 धावा केल्या.

वाचा लाईव्ह अपटेड –

 • बांगलादेश विजयी
 • बांगलादेशच्या 250 धावा पूर्ण
 • लिट्टन दासचे अर्धशतक
 • एक दिवसीय कारकीर्दीतील नववे शतक
 • शाकिबचे वर्ल्डकपमधील दुसरे शतक

 • लक्ष्य आता 100 च्या खाली
 • लिट्टन दास, शाकिब अल हसनमध्ये 100 धावांची भागिदारी
 • 120 चेंडूत 112 धावांची आवश्यकता
 • 30 षटकानंतर बांगलादेशच्या 3 बाद 210 धावा
 • बांगलादेशच्या 200 धावा पूर्ण
 • 25 षटकानंतर बांगलादेशच्या 3 बाद 166 धावा
 • बांगलादेशच्या 150 धावा पूर्ण
 • शाकिबचे वर्ल्डकपमधील तिसरे अर्धशतक

 • 180 चेंडूत 184 धावांची गरज
 • 20 षटकानंतर बांगलादेशच्या 3 बाद 138 धावा
 • बांगलादेशचा तिसरा धक्का, मुशफिकूर 1 धाव काढून बाद

 • कोटरेलने तमिम इक्बालला 48 धावांवर केले धावबाद
 • बांगलादेशला दुसरा धक्का, तमिम बाद

 • 15 षटकात बांगलादेशच्या 1 बाद 108 धावा

 • बांगलादेशच्या 100 धावा पूर्ण
 • दहा षटकानंतर बांगलादेशच्या 1 बाद 70 धावा
 • बांगलादेशला पहिला धक्का

 • बांगलादेशच्या बिनबाद 50 धावा पूर्ण
 • बांगलादेशची दमदार सुरुवात
 • बांगलादेशसमोर 322 धावांचे आव्हान
 • इंडीजच्या 50 षटकात 8 बाद 321 धावा
 • इंडीजच्या 300 धावा पूर्ण
 • शाई होपची बांगलादेशविरुद्ध कामगिरी
  सामने – 10
  धावा – 758
  सरासरी – 94.75
  शतकं – 3 आणि अर्धशतकं – 4
 • होपचे शतक हुकले, 96 धावांवर बाद
 • 45 षटकानंतर इंडीजच्या 6 बाद 288 धावा
 • इंडीजला सहावा धक्का, होल्डर बाद

 • इंडीजच्या 250 धावा पूर्ण
 • 40 षटकानंतर इंडीजच्या 5 बाद 243 धावा
 • इंडीजचा डाव संकटात, शाई होप मैदानात शड्डू ठोकून
 • हेटमायरपाठोपाठ रसेल शून्यावर बाद

 • वादळी अर्धशतकानंतर हेटमायर बाद
 • 25 चेंडूत ठोकले अर्धशतक
 • हेटमायरचे वादळी अर्धशतक

 • इंडीजच्या 200 धावा पूर्ण
 • शेवटच्या पाच षटकात 42 धावांची लूट
 • इंडीजने गिअर बदलला, 35 षटकात 3 बाद 193 धावा
 • इंडीजला तिसरा धक्का, पूरन 25 धावांवर बाद

 • शाई होपचे अर्धशतक

 • 30 षटकानंतर इंडीजच्या 2 बाद 151 धावा
 • इंडीजच्या 150 धावा पूर्ण
 • इंडीजला दुसरा धक्का, ल्युईस 70 धावांवर बाद

 • ल्युईसचे अर्धशतक, इंडीज 100 पार
 • इंडीजच्या 100 धावा पूर्ण
 • 20 षटकानंतर इंडीजच्या 1 बाद 86 धावा
 • ल्युईस आणि शाई होपमध्ये 50 धावांची भागिदारी

 • 15 षटकानंतर इंडीजच्या 1 बाद 64 धावा
 • वेस्ट इंडीजच्या 50 धावा पूर्ण
 • दहा षटकानंतर इंडीजच्या 1 बाद 32 धावा
 • पाच षटकानंतर एक बाद 8 धावा
 • इंडीजची खराब सुरुवात, गेल शून्यावर बाद
 • दोन षटकानंतर इंडीजच्या बिनबाद 2 धावा
 • पहिल्यांदा फलंदाजी करून मोठी धावसंख्या रचण्याची आमच्याकडे संधी आहे – जेसन होल्डर
 • आमची फलंदाजी चांगली असल्याने धावांचा पाठलाग करण्यास आवडेल – मुशरेफा मोर्तजा
 • बांगलादेशचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

 • वेस्ट इंडिज आणि बांगलादेशमध्ये सामना