World cup 2019 : रहिमची शतकी झुंज, बांग्लादेशचा पराभव


सामना ऑनलाईन । नॉटिंघम

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत पाच वेळचा जगज्जेता ऑस्ट्रेलिया आणि यंदा दिग्गज संघांना पराभवाची धूळ चारलेला बांग्लादेश संघ यांच्यात नॉटिंघमच्या मैदानावर सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 382 धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ 50 षटकात 8 बाद 333 धावांपर्यंत मजल मारू शकला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 48 धावांनी जिंकत गुंतालिकेत पहिल्या नंबरवर झेप घेतली आहे. बांग्लादेशकडून मुशफिकुर रहीमने शतकी झुंज दिली.

त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हीड वॉर्नरच्या 166 धावा, उस्मान ख्वाजाच्या 89, फिंचच्या 53 आणि मॅक्सवेलच्या 32 धावांची वादळी खेळाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 5 बाद 381 धावा केल्या.

वाचा लाईव्ह अपडेट –

 • बांग्लादेशचा पराभव
 • रहिमचे शतक
 • बांग्लादेशला सलग दोन धक्के
 • बांग्लादेश 300 पार
 • महमदुल्लाचे अर्धशतक
 • मुशफिकूर रहिमचे अर्धशतक
 • 90 चेंडूत 174 धावांची आवश्यकता

 • 35 षटकानंतर बांग्लादेशच्या 4 बाद 208 धावा
 • बांग्लादेशच्या 200 धावा पूर्ण
 • 120 चेंडूत 205 धावांची आवश्यकता
 • 30 षटकानंतर बांग्लादेशच्या 4 बाद 177 धावा
 • चौथा धक्का, लिट्टन दास 20 धावांवर बाद

 • बांग्लादेशच्या 150 धावा पूर्ण
 • 15 षटकानंतर बांग्लादेशच्या 3 बाद 146 धावा
 • बांग्लादेशला तिसरा धक्का, अर्धशतकानंतर तमिम बाद
 • तमिम इक्बालचे अर्धशतक
 • बांग्लादेशच्या 100 धावा पूर्ण
 • बांग्लादेशला दुसरा धक्का, शाकिब 41 धावांवर बाद

 • 15 षटकानंतर बांग्लादेशच्या 1 बाद 84 धावा
 • शाकिब-तमिममध्ये 50 धावांची भागिदारी
 • दहा षटकानंतर बांग्लादेशच्या 1 बाद 53 धावा
 • बांग्लादेशच्या 50 धावा पूर्ण
 • पाच षटकानंतर बांग्लादेशच्या 1 बाद 25 धावा
 • बांग्लादेशची खराब सुरुवात, पहिला खेळाडू बाद

 • दोन षटकानंतर बांग्लादेशच्या बिनबाद 9 धावा
 • डोंगराएवढ्या आव्हानाच्या पाठलागासाठी बांग्लादेश मैदानात
 • ऑस्ट्रेलियाचे बांग्लादेशविरुद्ध 382 धावांचे आव्हान
 • ऑस्ट्रेलियाच्या 50 षटकात 5 बाद 381 धावा
 • मैदानावरील कव्हर हटवले, खेळाला पुन्हा सुरुवात
 • पावसामुळे खेळ थांबला
 • ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत
 • ख्वाजाचे शतक हुकले, 89 धावांवर बाद

 • 10 चेंडूत 32 धावा काढून मॅक्सवेल रनआऊट
 • मॅक्सवेलची वादळी खेळी संपुष्टात

 • ऑस्ट्रेलियाच्या 350 धावा पूर्ण
 • झंझावती खेळीनंतर वॉर्नर 166 धावांवर बाद
 • ऑस्ट्रेलियाच्या 300 धावा पूर्ण
 • वॉर्नरच्या दीडशे धावा पूर्ण
 • 40 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 250 धावा
 • ऑस्ट्रेलियाच्या 250 धावा पूर्ण

 • ख्वाजाचे अर्धशतक, ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

 • 35 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 205 धावा
 • ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण
 • ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतकं ठोकणारे पाच खेळाडू –
  रिकी पॉन्टिंग – 29 शतकं
  मार्क वॉ – 18 शतकं
  डेव्हिड वॉर्नर – 16 शतकं*
  अॅडम गिलख्रिस्ट – 16 शतकं
  अॅरॉन फिंच – 14 शतकं*
 • वर्ल्डकप 2019 मधील दुसरे आणि कारकीर्दीतील 16 वे शतक
 • वॉर्नरचे दणदणीत शतक, ऑस्ट्रेलिया सुस्थितीत

 • 30 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 168 धावा
 • ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा पूर्ण
 • 25 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 139 धावा
 • अर्धशतकानंतर फिंच 53 धावांवर बाद
 • 20 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 117 धावा
 • फिंचचे अर्धशतक
 • ऑस्ट्रलियाच्या 100 धावा पूर्ण
 • 15 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 86 धावा
 • वॉर्नरचे 55 चेंडूत अर्धशतक

 • दहा षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 53 धावा
 • ऑस्ट्रलियाच्या 50 धावा पूर्ण
 • पाच षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 27 धावा
 • बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात
 • तीन षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 12 धावा
 • ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू
 • सैफुद्दीनच्या जागी रुबेल, तर मोसाडेकच्या जागी शब्बीर रहमानला संघात स्थान
 • बांगलादेशच्या संघात दोन बदल
 • स्टॉयनिस, झंपा आणि कुल्टर-नाईलचे संघात पुनरागमन; मार्श, रिचर्डसन आणि बेहरेड्रॉफ संघातून बाहेर
 • ऑस्ट्रेलियाच्या संघात तीन बदल
 • नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

 • बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना