शंकरला लॉटरी, वाचा ट्रोलींग ते थेट विश्वचषक संघात निवडीपर्यंतचा प्रवास

66

सामना ऑनलाईन । मुंबई

सोमवारी निवड समितीने विश्वचषकासाठी हिंदुस्थानच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. विराट कोहलीकडे कर्णधारपद तर रोहित शर्माकडे उपकर्णधारपद सोपण्यात आले आहे. विश्वचषकाच्या संघात अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याचाही नंबर लागला आहे. विशेष म्हणजे अंबाती रायडूच्या जागी शंकरला स्थान देण्यात आले आहे.

विश्वचषकासाठी हिंदुस्थानचा संघ जाहीर; जाडेजा, राहुल, कार्तिकला संधी

हिंदुस्थानी संघ जाहीर करताना निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद म्हणाले की, चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेनंतर आम्ही मधल्या फळीमध्ये अनेक खेळाडूंना संधी दिली. दिनेश कार्तिक, मनीष पांडे आणि अंबाती रायडू यांनाही संधी दिली. परंतु विजय शंकरची निवड करण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे तो एक चांगला फलंदाज आणि गोलंदाजही आहे. इंग्लंडसारख्या वातावरणामध्ये तो संघासाठी चांगले योगदान देऊ शकतो. शंकर हा एक चांगला गोलंदाज आहे, असेही प्रसाद म्हणाले.

#WorldCup2019 हिंदुस्थानचा संघ जाहीर, वाचा कधी आहेत हिंदुस्थानचे सामने

रायडूचा खराब फॉर्म
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अंबाती रायडूचा फॉर्म सातत्याने खालावत गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावरही रायडू विशेष कामगिरी करू शकला नाही. तसेच आयपीएलमध्येही त्याचा खराब फॉर्म सुरू आहे. याचमुळे रायडूचा पत्ता कट झाला आणि नवख्या शंकरला संधी देण्यात आली.

#WorldCup2019 पंतला डावलून कार्तिकला संधी, नेटिझन्समधून आश्चर्याचा सूर

ट्रोलींग ते थेट विश्वचषकात निवड
तमिळनाडूचा या खेळाडूचा संघातील प्रवासही उत्साहवर्धक आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या निदास ट्रॉफीमध्ये हार्दिकच्या जागी शंकरला संधी मिळाली. फायनलमध्ये हिंदुस्थानला अखेरच्या षटकांमध्ये विजयासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता असताना शंकरने फक्त 19 चेंडूत 17 धावा केल्या होत्या. परंतु कार्तिकच्या खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने विजय मिळवला. शंकरच्या कासवछाप फलंदाजीमुळे तो ट्रोल झाला होता. यानंतर त्याचे संघातील स्थानही डळमळीत झाले. परंतु अखेर त्याला पुन्हा संधी मिळाली आणि या संधीचे त्याने सोने केले. शंकरने आतापर्यंत 9 एक दिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगले योगदान दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या