न्यूझीलंड जिंकेपर्यंत विमान थांबवा; प्रवाशांची विनंती

air new zealand

सामना ऑनलाईन । मँचेस्टर

विश्वचषक लढतीत न्यूझीलंडने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 292 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज टीमने झुंजार खेळ केला. एअर न्यूझीलंडचे एक विमान उड्डाण घेण्यास तयार होते. मात्र विमानातील अनेक प्रवासी मोबाईलवर सामना पाहत होते. त्यामुळेच सर्वांनी सामना संपेपर्यंत विमानाचे उड्डाण थांबवावे अशी विनंती केबीन क्रूच्या माध्यामातून विमानाच्या कॅप्टनला केली.

एकीकडे गडी बाद होत असतानाच कार्लोस ब्रेथवेटने दुसरी बाजू लावून धरली आणि विजय अगदी वेस्ट इंडीजच्या दृष्टिपथात असताना षटकार मारायच्या नादात ब्रेथवेट बाद झाला अन् हा सामना न्यूझीलंडने पाच धावांनी जिंकला. मैदानात अटीतटीची लढत सुरू होती. केवळ 12 चेंडू आणि एक गडी शिल्लक असतानाच एअर न्यूझीलंडचे एक विमान उड्डाण घेण्यास तयार होते. मात्र विमानातील अनेक प्रवासी मोबाईलवर सामना पाहत होते. त्यामुळेच सर्वांनी सामना संपेपर्यंत विमानाचे उड्डाण थांबवावे अशी विनंती केबीन क्रूच्या माध्यामातून विमानाच्या कॅप्टनला केली. विशेष म्हणजे विमानाच्या कॅप्टनने प्रवाशांच्या विनंतीचा मान ठेवत सामन्याचा निकाल लागेपर्यंत विमानाचे उड्डाण केले नाही. 12 पैकी सहा चेंडूंत सामन्याचा निकाल लागला अन् सामना न्यूझीलंडने जिंकला. त्यावेळी विमानातील प्रवाशांनी एकच जल्लोष केला अन् विमानाने उड्डाण केले.