बांगलादेशात निपाह व्हायरसने महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशात निपाह व्हायरसमुळे महिलेचा मृत्यू झाला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. बांगलादेशातील या महिलेला 21 जानेवारीला निपाह व्हायरसची लक्षणे आढळली होती. ताप, डोकेदुखी, तोंडातून लाळ येणे अशी लक्षणे दिसत होती. आठवडाभराच्या उपचारानंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला अन्य कोणत्याही देशात गेली नव्हती. या घटनेमुळे आशियातील विमानतळावर स्क्रिनिंग वाढवण्यात आली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी हिंदुस्थानातही दोन घटना उघडकीस आल्या असून या दोन्ही घटनांत पश्चिम बंगालच्या 24 परागनामधील आरोग्य कर्मचारी होते.