
कोविड संकटाचा सामना करताना तंत्रज्ञानाची खूपच मोलाची मदत झाल्याची माहिती आता पुढे आली आहे. आज जागतिक तंत्रज्ञान दिन साजरा होणार असतानाच कोविडमध्ये तब्बल एक लाख मजुरांशी संपर्क साधणारे ‘मोबाईल अॅप’ फक्त 48 तासांत तयार झाल्याची दिलासादायक माहिती राज्याचे तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
काही स्थानिक उद्योजकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून झटपट व्हेंटिलेटर बनवले. केवळ दोन आठवडय़ात हे अशक्य काम शक्य झाले. इचलकरंजीमधील उद्योजकांनी तर पीपीई कीट बनवले. लाकडाच्या खाटा तात्काळ तयार केल्या. हे सगळे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले, असे पाटील म्हणाले.
नाविन्यपूर्णतेसाठी रॉकेट सायन्सची गरज नसते तर त्यासाठी एक चांगले मोबाईल अॅप पुरेसे असते. हजारो लोकांच्या आयुष्यात त्यामुळे सकारात्मक बदल घडवून आणता येतात, असे पाटील म्हणाले.























































