‘ही’ आहे जगातील विशालकाय गुहा; सामावतील अनेक गगनचुंबी इमारती!

जगभरात अनेक रहस्यमयी गुहा आहेत. त्यातील काही गुहांची रहस्ये अद्यापही उलगडलेली नाहीत. अशा गुहांची अनेकदा चर्चा होते. तर काही गुहा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. मात्र, जगातील सर्वात मोठी गुहा कोणती असा प्रश्न अनेकांना पडतो. जगात एक अशी विशालकाय गुहा आहे, ज्यात अनेक गगनचुंबी इमारती सामावतील एवढी गुहा विस्तृत आहे. जगातील ही सर्वात विशालकाय गुहा व्हिएतनाममध्ये आहे. सोन डोंग या नावाने ही गुहा ओळखली जाते.

व्हिएतनाममधील सोन डोंगमधील जंगलात ही गुहा आहे. यात 40 मजली अनेक गगनचुंबी इमारती उभ्या राहू शकतात, एवढी ही गुहा विस्तृत आहे. सोम डोंग गुहेचा योगायोगाने शोध लागला आहे. ही गुहा आठ वर्षांपूर्वी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. भूमिगत भूलभुलय्या असलेली ही गुहा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. या गुहेची विस्तृतता बघून पर्यटक भारावून जातात.

या गुहेची लांबी 9 किलोमीटर आहे. या मुख्य गुहेत आणखी 150 गुहा आहेत. हे याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे या गुहेत घनदाट जंगल आणि भूमिगत नद्या आहेत.
तसेच गुहेत मोठ्यामोठ्या इमरतींएवढे पहाड आहेत. या गुहेची स्वतःची अशी इको सिस्टीम आणि वेगळे वातावरण आहे. येथील वातावरण बाहेरच्या जगातील वातावरणापासून पूर्णपणे वेगळे आहे, असे या गुहेत गाइडचे काम करणाऱ्या हो मिन्ह यांनी सांगितले.

ही गुहा वटवाघूळांचे नैसर्गिक अधिवास आहे. तसेच अनेक नैसर्गिक आश्चर्येही यात आहेत. पर्यटकांसाठी 2013 मध्ये ही गुहा खुली करण्यात आली होती. त्यानंतर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन बदलले आहे. त्यांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. सोन डोंगची ही गुहा 1991 मध्ये स्थानीक वनवासी हो खान यांची शोधली होती. चून्याचा एक खडक दूर केल्यानंतर ते ठेचाळून पडले. त्यावेळी त्यांनी भूमिगत नदीच्या खळखळाटाचा आवाज आला. त्याचा शोध घेतला असता ही गुहा त्यांना सापडली.

याबाबत त्यांनी संशोधकांना याची माहिती दिली. ब्रिटीश संशोधकांचे एक पथक 2009 मध्ये आले. त्यावेळी ही जगातील सर्वात मोठी गुहा असल्याचे त्यांनी सांगितले. या गुहेत अनेक गगनचुंबी इमारती सामावतील एवढी ही मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या गुहेची माहिती जगभरात पसरली. त्याची लोकप्रियता बघता ही गुहा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या गुहेचे आकर्षण पर्यटकांमध्ये वाढत असल्याचे या गुहेच्या यात्रेचे आयजन करणाऱ्या ऑक्सालिस या ट्रॅव्हल कंपनीने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या