वरळी कोळीवाड्याचे नाव अमेरिकेत चमकले, सामाजिक कार्यासाठी शरद कोळी यांना जॉर्ज युनिव्हर्सिटीची पीएच. डी.

852

वरळी कोळीवाड्यातील भूमिपुत्राने आपल्या कार्याचा ठसा अमेरिकेत उमटवला आहे. शरद वासुदेव कोळी असे त्यांचे नाव असून त्यांना अमेरिकेतील ‘जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ पीस’ या संस्थेने डॉक्टर ऑफ सोशल सर्विसेस (पीएच. डी) ही पदवी देऊन सन्मानित केले आहे. शरद कोळी यांच्या 20 वर्षांच्या सामाजिक कार्याचा हा गौरव आहे. पुरस्कार सोहळा नोव्हेंबर महिन्यात श्रीलंका येथे होणार आहे.

शरद कोळी हे वरळी कोळीवाड्यात गोल्फा देवी कॉलनीत राहतात. त्यांनी टेक्सटाईल डिप्लोमा केला असून सध्या ते एलएलबीच्या तिसNया वर्षाला आहेत. ते स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वरळी कोळीवाड्यात सामाजिक कार्य करतात. गेली अनेक वर्षे शालेय विद्यार्थांना वह्यावाटप, महिला बचत गटाचे कार्यक्रम आयोजित करत आहेत. काही वर्षांपूर्वी स्थानिकांच्या मदतीने ऐतिहासिक वरळी किल्ला वाचवण्याची मोहीम त्यांनी यशस्वी केली. तीन वर्षांपूर्वी एलएलबीच्या विद्याथ्र्यांच्या हितासाठी त्यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. ६० ते ७० हजार लोकसंख्या असलेल्या वरळी कोळीवाड्यातील रस्ते अरुंद असल्याने अॅम्बुलन्स किंवा अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचू शकत नाही. त्यामुळे वरळी किल्ल्यापासून कोस्ट गार्ड भिंतीच्या मागे असलेल्या समुद्रापर्यंत रस्ता करावा अशी मागणी कोळी यांनी नुकतीच केली आहे. एसआरए योजनेंतर्गत वरळी गावातील ७०० कुटुंबांना एकत्र आणून पुनर्विकास योजना यशस्वी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अलीकडच्या निसर्ग चक्रीवादळात किनाNयावरील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात तसेच ज्यांच्या घरांचे पत्रे उडाले, त्यांना पत्रे वाटप करण्यात शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खूप मदत झाली, असे शरद कोळी यांनी सांगितले. या सर्व कामांची माहिती ‘थिसिस’ स्वरूपात पुराव्यानिशी जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीकडे पाठवल्यानंतर हा सन्मान प्राप्त झाल्याचे कोळी यांनी सांगितले.

कोरोना योद्धा
वरळी कोळीवाड्यात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर शरद कोळी यांनी लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांशी संपर्वâ साधून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, बेड उपलब्ध करून देणे, वस्तीतील लोकांना रास्त दरात भाजीपाला, फळं उपलब्ध करून देणे अशी सामाजिक कामे केली. वरळीत अडकलेल्या ८०० परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्याच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना डॉक्टर ऑफ सोशल सर्विसेस देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या