
चंद्रपुरातील नामांकित समाधान पूर्ती सुपर बाजारातून खरेदी केलेल्या उत्तम कंपनीच्या गुलाब जाम मिक्स पावडर मध्ये मोठ मोठ्या अळ्या निघाल्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहरातील नामांकित बाजारामध्ये असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केल्या जात आहे.
दोन दिवसा आधी भडके हे चंद्रपूरला सामान खरेदी करिता शहरातील जेटपुरा गेट जवळील समाधान पूर्ती बाजारात गेले व तिथून उत्तम नावाचा गुलाब जाम मिक्स पावडर पाकिट आणि डोनट अश्या दोन वस्तू विकत घेतल्या.
त्याचे अनुक्रमे 60 आणि 10 एकूण 70 रुपये बिलही दिलं , घरी येऊन दुसऱ्या दिवशी पाकिट फोडून एका ताटामध्ये घेतल्यावर त्यातून पांढऱ्या तपकीरी रंगाच्या अळ्या बाहेर चालायला लागल्या. आजूबाजूच्याना बोलावून दाखवलं, सर्वाना जब्बर धक्का बसल्याने आश्चर्य व्यक्त करीत चिंतासुद्धा व्यक्त केली आहे.
चंद्रपुरातल्या नामांकित समाधान पूर्ती सुपर बाजारातील विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्वच वस्तूच्या दर्जाविषयी त्यांनी शंका व्यक्त केली असून चौकशी करत कारवाईची मागणी भडके यांनी केली आहे.



























































