लेखिकेची फसवणूक करणारी अटकेत

स्वस्तात वस्तू मिळवून देते असे सांगून लेखिकेची फसवणूक करणाऱया महिलेला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. हिना रमाकांत शर्मा असे तिचे नाव आहे. तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तक्रारदार या लेखिका आहेत. त्या मोटिवेशनल स्पीकिंगचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत असतात. त्यांच्या ऑफिसमध्ये हिना ही मॅनेजर म्हणून काम करत होती. ते व्हिडीओ एडिटिंग करून ते अपलोड करण्याचे काम हिना करायची.

दोन वर्षांपूर्वी त्यांचा लॅपटॉप खराब झाला होता. तेव्हा हिनाने आपला अंबरनाथ येथे राहणारा मित्र स्वस्तात लॅपटॉप, घडय़ाळ, मोबाईल फोन देतो असे तिने महिलेला सांगितले. तसेच तो 15 ते 20 टक्के सवलत देऊन गिफ्टदेखील देतो असे तिने भासवले. वस्तू खरेदीच्या नावाखाली तिने महिलेकडून 3 लाख 70 हजार रुपये घेतले. स्वस्त वस्तू मिळत असल्याने महिलेने हिनाला पैसा पाठवले. पैसे पाठवल्यानंतर महिलेने हिनाला वस्तूसाठी संपर्क केला. तेव्हा ती ते साहित्य गोदामातून पॅक झाले असून लवकरच येईल अशा ती भूलथापा मारायची.