असं झालं तर… तुमच्या गाडीला चुकीचे ई-चलन आले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही कारणामुळे तुमच्या गाडीला चुकीचे ई-चलन आले असेल, तर घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरी ते रद्द करू शकता.

महाट्रफिक ई-चलन ऍप / संकेतस्थळाला भेट द्या किंवा केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाच्या ई-चलन परिवहन पोर्टलवर नाव, नंबर टाकून रजिस्टर करा.

होमपेजवर ‘Grievance’ किंवा ‘Raise a grievance’ वर क्लिक करा. नाव, मोबाईल नंबर, वाहन क्रमांक आणि ई-चलन क्रमांक व्यवस्थित प्रविष्ट करा.

Description Box मध्ये चलन चुकीचे का आहे याचे कारण लिहा. वर्णनात चुकीचा फोटो, वाहन नंबरमध्ये तफावत यासह अन्य चलनचा उल्लेख करा.

फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक तक्रार क्रमांक मिळेल. तुमची चूक नसल्यास तक्रारींचे निवारण होण्यासाठी 45 दिवस लागू शकतात.