अबब…! ‘या’ कंपनीचा विक्रम, एका मिनिटांमध्ये विकले 200 कोटींचे स्मार्टफोन

11564

स्मार्टफोनची बाजारपेठ दर वर्षी सुमारे 80 टक्क्यांनी वाढत असून यात चीन पहिल्या स्थानावर आहे. स्मार्टफोनची बाजारपेठ काबिज करण्यासाठी जगभरातील स्मार्टफोन कंपन्या नवनवीन फिचर्स आणि व्हेरिएन्टचे स्मार्टफोन दरवर्षी लॉन्च करत असतात. नुकताच शोओमी या चिनी कंपनीने बहुचर्चीत ‘एमआय-10’ (Mi10) हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे लॉन्चिंगनंतर या फोनने धमाल उडवून दिली असून अवघ्या एका मिनिटामध्ये 200 कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची विक्री केली आहे.

शाओमीच्या ‘एमआय-10’ (Mi10) हा स्मार्टफोन शुक्रवारी चीनच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला. पहिल्या एका मिनिटामध्येच सर्व स्मार्टफोन विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने किती स्मार्टफोन विक्री झाले याची माहिती दिली नसली तरी याची किंमत 200 कोटी रुपये आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनचा दुसरा सेल 21 फेब्रुवारीला असणार आहे.

mi-note-10-1

‘एमआय-10’ (Mi10) स्मार्टफोन 3 व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे.

  • 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजवाल्या स्मार्टफोनची किंमत 3,999 युआन (40,800 रुपये) आहे.
  • 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजवाल्या स्मार्टफोनची किंमत 4,299 युआन (44,000 रुपये) आहे.
  • 12 जीबी रॅम आणि 256 स्टोरेजवाल्या स्मार्टफोनची किंमत 4,699 युआन (48,000रुपये) आहे.

mi-note-10-2

वैशिष्ट्य –

  • 6.67 इंचांचा कर्व्ह अमोलेड डिस्ले
  • ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर
  • 12 जीबीपर्यंत रॅम आणि युएफएस 3.0 स्टोरेज
  • प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल
  • 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
  • Wi-Fi6, ब्लूटूथ 5.1, ड्यूल-मोड 5G आणि NFC सारखे फिचर
  • 30W वायरलेस फास्ट चार्जिंग
आपली प्रतिक्रिया द्या