Xiaomi चा फास्ट चार्जर हिंदुस्थानात लॉन्च, वाचा जबरदसत फीचर

Xiaomi ने हिंदुस्थानात Mi 33W Sonic Charge 2.0 चार्जर लॉन्च केला आहे. हा साधासुधा चार्जर नसून फास्ट चार्जर आहे. यापूर्वी कंपनीने हिंदुस्थानात 27W चार्जर लॉन्च केला होता.

Mi 33W Sonic Charge 2.0 हा आधीच्या चार्जरच्या तुलनेत जास्त वेगाने फोन चार्ज करतो. त्याचे आऊटपूट 33W असून Qualcomm Quick Charge 3.0 ला सपोर्ट करतो.

चार्जरसोबत 100 सेमीची Type C केबल देण्यात आली आहे. या चार्जरला 380V सर्च प्रोटेक्शन दिले असून कंपनीच्या वेबसाईटवरून तुम्ही विकत घेऊ शकता.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा चार्जर हिंदुस्थानातच बनवण्यात आला आहे. त्यात ऑटोमॅटिक टेंप्रेचर कंट्रोलचे फीचर देण्यात आले आहे. त्यामुळे तुमच फोन गरम होणार नाही. तसेच या चार्जरने तुम्ही दुसर्‍या कंपनीचाही मोबाईल चार्ज करू शकता.

हा चार्जर युनिव्हर्स्ल सपोर्ट म्हणजेच 100-240V सपोर्टिव असून तुम्ही कुठेही प्लग करू शकता. या चार्जरची किंमत सध्या 999 आहे. तसेच ज्या फोनला फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे त्याच फोनसाठी हा चार्जर बनवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या