
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या तिच्या ‘हक’ या चित्रपटाच्या प्रमोशनवरून चर्चेत आहे. हा चित्रपट उद्या 7 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. यामी गौतमने नुकतीच एक मुलाखत दिली असून त्यात ती दीपिका पादूकोणच्या आठ तासांच्या शिफ्टवर बोलली आहे. बॉलीवूडमध्ये असे अनेक पुरुष कलाकार आहेत, जे केवळ आठ तासांची शिफ्ट करतात. पाच दिवस काम केल्यानंतर विकेंडला सुट्टी घेतात. त्यामुळे त्यांची वर्क लाइफ बॅलन्स राहते, परंतु कोणती महिला कलाकार आठ तासांच्या शिफ्टवर बोलली तर लगेच वाद निर्माण होतो. कोणतीही महिला असो किंवा घरकाम करणारी महिला असो, ती तिच्या मुलांसाठी खास असते. आपल्या मुलांसाठी सर्व काही करते, परंतु आमचे काम इतर महिलांच्या तुलनेत जरा वेगळे आहे, असे यामी म्हणाली.





























































