आदिवासी बांधवांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध – वनमंत्री संजय राठोड

409

वनविभागाचा मंत्री या नात्याने आदिवासी समाजाला वन तसेच वनक्षेत्र याबाबत दिलेले संविधानिक हक्क व अधिकार यांचे संरक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. वनविभागांतर्गत विविध योजना व कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सामुहिक वन हक्क व्यवस्थापनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचा विभागाचा मानस आहे. आदिवासी भागात राज्य योजनेतून तसेच जिल्हा योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास, वृक्ष व फळबाग लागवड, वन्यजीव व जैवविविधतेचे संरक्षण याबाबत वनविभाग काम करीत आहे. या योजनांचा आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या