येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमेचा उत्सव रद्द

496

महाराष्ट्रा बरोबरच आंध्र कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या धाराशिव जिल्हयातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमेचा यात्रोत्सोव कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थीतीमुळे रद्द करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तीन पुजाऱ्यांनीच देवीची बंदिस्तपणे आरती केली. आठ ते दहा लाखाच्या भक्तसागरात होणारी शंभर वर्षाची यात्रेची परंपरा प्रथमच खंडित झाली.

गोरगरीब भक्तगणांचे संसार उघड्यावर आल्याने मंदिर ट्रस्टने पंचक्रोशीतील भक्तगणांच्या दारी जाऊन जीवनावश्यक अन्नधान्यांचे वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या