येवल्यात 1800 शेतकऱ्यांना 25 कोटींचे कर्जवाटप

462

पीक कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकच तालुक्यात शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे. सहकार विभागाने सुलभ पिक कर्ज अभियान हाती घेतले असून आजपर्यंत एक हजार 774 शेतकऱ्यांना 25 कोटी 62 लाखांचे कर्जवाटप झाले आहे. जिल्हा बँक अडचणीत असल्याने आता राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचाच आधार शेतकऱ्यांना मिळाला आहे.

खरीप पीककर्ज वाटपाबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनेनुसार तालुक्यात सुलभ कर्जवाटप अभियान राबविण्याच्या सूचना करत उपविभागीय अधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे, सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांनी जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी कर्जवाटपाचा इंष्टांक पूर्ण करत कोणताही पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे कर्जवाटपाला गती मिळत आहे.

असे झाले कर्जवाटप –
2019 – सप्टेंबरअखेर जिल्हा बँकेच्या 10 शाखातून 1 हजार 38 शेतकऱ्यांना 10 कोटी 49 लाखांचे तर व्यापारी व ग्रामीण बँकांच्या 13 शाखांतून 1 हजार 860 शेतकऱ्यांना 34 कोटी 28 लाखांचे कर्जवाटप झाले होते.
2020 – जूनअखेर जिल्हा बँकेच्या 10 शाखांतून 826 शेतकऱ्यांना 8 कोटी 69 लाखांचे तर व्यापारी व ग्रामीण बँकांच्या 14 शाखांतून 1 हजार 948 शेतकऱ्यांना 16 कोटी 92 लाखांचे कर्जवाटप झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या