अमेरिकेत सुरू होणार योग विद्यापीठ, हिंदुस्थानाबाहेर पहिल्यांदाच मिळणार योग अभ्यासक्रमाचे धडे

329

हिंदुस्थानप्रमाणेच परदेशातही योगाचे महत्त्व लोकांच्या लक्षात यावे तसेच त्यांना याचे शिक्षण मिळावे, या हेतूने हिंदुस्थानबाहेर पहिल्यांदाच अमेरिकेत योग विद्यापीठ सुरू होणार आहे. या विद्यापीठात योग अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण दिले जाणार असून येत्या एप्रिलपासून या विद्यापीठातील प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.

विवेकानंद योग विद्यापीठाने (वायू) या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. सुरुवातीला लॉस एंजलिसमध्ये विद्यापीठाचे कॅम्पस बनवण्यात आले आहे. याठिकाणी योगसन व त्यासंबंधीचे शिक्षण दिले जाणार आहे. या विद्यापीठासाठी 5 दशलक्ष डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे. केस वेस्टर्न युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक श्री श्रीनाथ यांना या विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे, तर हिंदुस्थानी योग गुरू एच. आर. नागेंद्र यांची चेअरमन म्हणून निवड करण्यात आली आहे. विद्यापीठ स्थापनेचे काम ऑगस्ट महिन्यापासून सुरु केले जाणार आहे, तर एप्रिल महिन्यापासून योगामध्ये मास्टर कोर्स करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

  • ब्युरो ऑफ प्रायव्हेट पोस्टकॉन्डरी एज्युकेशन, कॅलिफोर्नियाने अधिकृत मान्यता मिळवल्यानंतर पुढील तीन महिन्यांतच योग विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये मान्यता देण्यात आली होती.
  • नासाचे माजी वैज्ञानिक नागेंद्र हे मागील चार दशकांपासून योगाचा प्रसार, शिक्षणासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांनीच योग विद्यापीठ स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या