बॅनर नीचे कर दो, वरना हमेशा बेरोजगार रह जाओगे!

1801

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक खळबळजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आदित्यनाथ सीएए विरोधकांना बॅनर नीचे कर दो, वरना हमेशा बेरोजगार रह जाओगे, हटाओ उसको, असा धमकीवजा इशारा देताना दिसत आहेत. या व्हिडीओत उत्तर प्रदेश सरकारच्या धोरणाविरोधातील घोषणांचा आवाजही ऐकायला येतोय. या व्हिडीओला देशभरातील युवकांनी चांगलेच ट्रोल केले असून उत्तर प्रदेश सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेधही आपल्या संदेशातून केला आहे.

सोशल मीडिया युजर गीतनून79 ने व्हिडीओला शेअर करताना म्हटलेय, हुकूमशहा जे सुशासन आणि विकासात अपयशी ठरतात आणि मग बेकारीच्या विरोधात आंदोलन करणाऱया युवकांना धमकावतात. हा भाजप व आरएसएसला मते देण्याचा परिणाम आहे. सोशल मीडिया युजर एस.के. यांनी लिहिलेय, त्यांना नोकरी नकोय. त्यांनी राममंदिर आणि हिंदू राष्ट्रासाठी मत दिलेय. आता भिकेचा रोजगार या सर्वांना मिळेल. मंदिरांच्या बाहेर हे सर्व कटोरा घेऊन भिक्षा मागायला बसतील.

आपली प्रतिक्रिया द्या