
गोमातेचे रक्षण करण्याकरिता राज्यभर सुरू झालेल्या गोशाळांनी आता स्वयंपूर्ण बनावे, अशी सूचना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. योगी केवळ सूचना करून थांबले नाहीत, तर गोशाळांना स्वयंपूर्ण करण्याचे काही फंडेही त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यापैकी एक म्हणजे शेणापासून बनवलेल्या नैसर्गिक रंगाचा वापर करून सरकारी इमारतींच्या भिंती रंगविण्याचा. गोशाळांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी सरकारी इमारतींमध्ये शेणावर आधारित नैसर्गिक रंगाचा वापर करता येईल. त्यामुळे त्याचे उत्पादन वाढवावे, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले.