केगाव तलावात तरुण बुडाला

23

सामना प्रतिनिधी। उरण

उरण तालुक्यातील केगाव तलावात पडलेला फुटबॉल काढताना विराज पाटील हा ३० वर्षीय तरुण बुडाला आहे. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिकांच्या मदतीने पोलीस विराजचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विराज हा आपल्या मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यास गेला होता. खेळून झाल्यानंतर तो मित्रांसोबत केगाव तलावाजवळ आला होता. फुटबॉल तलावात पडल्याने विराज तो काढण्यासाठी एका मित्रांसोबत उतरला होता. मात्र फुटबॉल काढताना विराजचा पाय घसरला आणि तो बुडाला. मित्रांनीही त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तो विफळ ठरला.

विराजचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या दुदैवी निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या