जळगावात वृध्द दाम्पत्याचा खून करून दरोडा घालणाऱ्य़ा आरोपीला अटक, दागिन्यांसह रोख रक्कम जप्त

1113

जळगावात एका वृद्ध दाम्पत्याचा गळा चिरून खून करण्यात आला होता. तसेच घरातून दागिने आणि रोख रक्कमही चोरी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी परेश भारंबे या तरुणाला अटक केली आहे.

परेश भारंबे हा सुशिक्षित असून तो इंजिनीअरिंगच्या दुसर्‍या वर्षात शिकत आहे. परेश पूर्णपने व्यसनाधीन झाला होता आणि त्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे दरोडा घालण्याचा निर्णय त्याने घेतला होता. परेशने 10 सप्टेंबर रोजी सकाळी भारंबे दाम्पत्याच्या घरात दोघांचा खून करून हजारो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. पोलिसांनी या प्रकरणाचा खोल तपास करून परेशला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 54 हजार 340 रु रोख, तसेच 32 हजार 381 रु किमतीचे सोन्याचे दागिने,असा एकूण 86 हजार 721 रु किमतीचा ऐवज व खुनासाठी वापरलेले धारदार चाकू जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या