अंबडला मराठा आरक्षणासाठी तरुणाने विष घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अंबड

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील चिकनगाव येथील युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. चिकनगाव येथील सुनील भाऊसाहेब खांडेभराड (26) हा आरक्षण आंदोलनात सहभागी असायचा. आरक्षण मिळत नसल्याने तो काही दिवसांपासून व्यथित होता असे त्याचे चुलते भिकाभाऊ यांनी सांगितले. रविवारी सकाळी 9.30 वाजता सुनीलने राहत्या घरी खालच्या मजल्यावर येऊन विषारी औषध घेतले आणि आत्महत्या केली.