लॉकडाऊन दरम्यान गेला प्रेयसीला भेटायला, मुलीच्या घरच्यांनी बदडून घेतला जीव           

2864

कोरोनाचे संकट पाहता संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन सरकार करत आहेत. असे असताना एका तरुण आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला आणि ते त्याच्या जिवावर बेतले आहे. एक तरुण आपल्या अल्पवयीन प्रेयसीला घरी भेटायला गेला, तेव्हा तिच्या घरच्यांनी त्याला पकडले आणि खूप मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यात सरफराज याचे शेजारीच राहणार्‍या एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. शुक्रवारी रात्री सेराज तिला भेटायला घरी गेला. मुलीच्या वडिलांनी सेराजला आपल्या मुलीसोबत पाहिल्याने त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. नंतर मुलीच्या वडिलांनी घरातील सगळ्यांना उठवले आणि सरफराजला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. त्यात सरफराज  गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या इस्पितळात दाखल तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांवर आणि इतर दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या