टेंबवली खाडीपात्रात युवकाचा बुडून मृत्यू

652
sunk_drawn_death_dead_pic

टेंबवली राणेवाडी येथील मंगेश अशोक राणे (वय 32) यांचा टेंबवली येथील खाडी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ते शनिवारी सकाळी घडली आहे. याबाबत मंगेश दुर्योधन राणे यांनी देवगड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत मंगेश राणे दूध पोहचवण्यासाठी टेंबवलीहून होडीतून वानिवडे या गावी जात असत. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी दूध पोहचवण्याकरता वानिवडे या गावी गेले होते. ते दुपारी 2 वाजता परत आले. त्यानंतर ते बाहेर पडले होते. ते सायंकाळपर्यंत घरी परतले नाही. त्यांचा आजूबाजूला शोध घेण्यात आला. शनिवारी सकाळी टेंबवली खाडी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार उदय शिरगावकर करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या