शरीरावर सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

suicide

केरळमधील एका तरुणाने वाराणसी येथील मंदिरांना भेट देऊन नंतर तेथील हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या तरुणाने स्वत:च्या शरिरावर सुसाईड नोट लिहली असून त्यावर त्याने ‘महादेव, प्लीज माझ्या शरीराला कुठेही पाठवू नकोस’, असे लिहले आहे. या तरुणाने आत्महत्येचे कारण लिहलेले नाही. या तरुणाच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.

केरळमध्ये राहणारा सदर तरुण 8 जानेवारी रोजी वाराणसी येथे आला होता. तेथे काही मंदिरांना त्याने भेट दिली. त्यानंतर तो केरळला परतणार होता. मात्र त्याआधीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत. या तरुणाचे दोन वर्षांपूर्वच लग्न झाले होते त्याला एक सहा महिन्यांची मुलगी देखील आहे.

आपली प्रतिक्रिया द्या