उघड्यावर लघुशंका करण्यास रोखले, नवी मुंबईत तरुणाचा खून

उघड्यावर लघुशंका करण्यास रोखले म्हणून नवी मुंबईत एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. सचिन पाटील असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील रबाळ्यात आकाश गायकवाड आणि त्याचे तीन मित्र उघड्यावर लघुशंका करत होते. तेव्हा सचिन पाटील या तरुणाने चौघांन अडवले. त्यावरून आकाश आणि त्याच्या मित्राने सचिनला मारहाण केली. या मारहाणीत सचिनचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या