Video- कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झाडाचा आसरा, मचाण बांधून झाला क्वारंटाईन

930

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने चक्क झाडाचा आसरा घेतला आहे. होम क्वारंटाईनसाठी घर लहान असल्याने होम क्वारंटाईन घरात न करता वडाच्या झाडावर मचाण बांधून निसर्गाच्या सान्निध्यात क्वारंटाईनचा एक वेगळाच आनंद हा तरुण उपभोगू लागला आहे. खानापूर तालुक्यातील घाणंद येथील गलई व्यावसायिक असणाऱ्या या तरुणाचं परशुराम कुमठे असे नाव आहे.

कोरोनाने संपूर्ण देशभर सर्वांच्या उरात धडकी भरवली आहे. सांगली जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे मुंबई व बाहेरच्या इतर शहरातून सांगलीच्या आपल्या मूळ गावी लोक मोठ्या संख्येने आले आहेत, येत आहेत. खानापूर तालुक्यातील घाणंद येथील परशुराम कुमठे हा तरुणही गलई व्यवसायाच्या निमित्ताने कर्नाटकातील म्हैसूर उटी या भागात होता तो आपल्या गावी आला आहे. प्रशासनाने त्याला होम क्वारंटाईन केले. चौदा दिवसांच्या कालावधीत घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या. परंतु घर लहान आणि घरात इतर सदस्य असल्यामुळे घरात राहणे अडचणीचे वाटल्याने त्यांनी घराशेजारीच तात्पुरती झोपडी बांधून त्यात राहण्याचा निर्णय घेतला. परंतु उकाड्यामुळे तो हैराण झाला.

घराशेजारी असणाऱ्या भल्यामोठ्या वडाच्या झाडांनी त्याला भुरळ घातली. मग त्याने झाडावर चढून, व्यवस्थित मचाण बांधून निवाऱ्याची सोय केली आणि तिथेच आपला मुक्काम ठोकला. घरातून वेळच्या वेळी अन्नपाणी मिळतं. कुणाचा संपर्क नाही की, संवाद नाही. निसर्गाच्या सान्निध्यात हा तरुण क्वारंटाईनचा एक वेगळाच आनंद घेत आहे. सांगली जिल्ह्यातील या अनोख्या क्वारंटाईनची चर्चा जोरदार रंगली आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या