आजच्या तरुणाईला काय वाटतं पॉकेटमनी बाबत, वाचा सविस्तर…

213

पॉकेटमनी… आई-बाबांकडून तुम्हाला पॉकेटमनी किती मिळतो…? शॉपिंग, पार्टी, खाऊ, मज्जा या सगळ्यांसाठी तो पुरतो…? पूर्वी पॉकेटमनीची पद्धतच नव्हती. काही हवं असलं की घरातल्या मोठय़ा माणसांना सांगायचं… सहज हवी ती वस्तू मिळायची.. अर्थात फाजील लाड कधी केले गेले नाहीत आणि फाजील मागण्याही कधी झाल्या नाहीत. पण बऱयाच घरांतून पॉकेटमनीची पद्धत होती… आहे… पाहूया आजच्या तरुणाईचा पॉकेटमनी.

त्याची कधी कमतरता भासली नाही

पैसे कितीही असले तरी कोणी समाधानी असतं का? मी पहिली ते दहाकी ग्रामीण शाळेमध्ये शिकलो. तेक्हा मला एक रुपया मिळाला तरी खूप आनंद क्हायचा. असे अनेकदा मी पैसे बचत करून काही वस्तू किकत घ्यायचो. माझी ती सकयच होती. हॉस्टेलला असताना पैसे हॉस्टेलमधल्या सरांकडे ठेकायला द्यायचे. पण मी थोडे पैसे गुपचूप माझ्या बॅगेत ठेकायचो आणि चोरून पॅटिस अथका कडापाक खायचो. पूर्वी प्लॅस्टिकचा डबा यायचा. मिळालेले पैसे त्यामध्ये टाकायचो आणि महिनाभराने तो डबा कापून किती पैसे जमा झाले हे बघायचो. त्यानंतर कॉलेज आयुष्य सुरू झाल्यानंतर बाबांच्या व्यवसायात त्यांना मदत करायला लागलो आणि मग कधी पॉकेटमनीची कमतरता भासली नाही. पण आजही मिळालेले पैसे मी सेव्हिंग करतो.

सिद्धांत येडगे, मॉडर्न कॉलेज

खर्चाची नोंद ठेवते

माझा पॉकेटमनी मी जमवते. त्या पॉकेटमनीचे मी व्यवस्थित नियोजन करते. त्यामध्ये मिळकत आणि खर्च याची नोंद ठेवते. नोंद असल्यामुळे पैसे कुठे आणि कशासाठी वापरले जातात हे आपल्याला कळते. त्यामुळे मला माझा पॉकेटमनी पुरतो. पॉकेटमनीसाठी घरच्यांना त्रास का द्यायचा? निदान माझा स्वतःचा खर्च स्वतः भागवता येतो यात आनंद आहे. मी घरी शिकवण्याही घेते. त्यातून मला पैसे मिळतातच, शिवाय शिकवण्यांमुळे माझ्या ज्ञानातही भर पडते. आतापासून मी माझ्या भविष्याची तरतूद करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी मी पोस्टात, बँकेत पैसे जमा करतेय. यामुळे माझी बचत खूपच वाढली आहे. आजची बचत हीच भविष्याची मिळकत आहे हे मला पक्के ठाऊक आहे.

निकिता सकपाळ, एमएमपी शहा वुमन्स कॉलेज

शैक्षणिक खर्च भागतो

मला माझा पॉकेटमनी पुरतो. कारण माझ्या गरजा कमी आहेत. मला कुठलंच व्यसन नाहीय. माझा खर्च हा केवळ प्रवासावरच होतो. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत कॉलेज असल्याने माझा जास्तीचा खर्च होत नाही. कॉलेजनंतर मी बाबांना मदत करायला जातो. त्यामुळे बाबाही मला त्यासाठी पॉकेटमनी देतात. कॉलेजमध्येही बरंच खायला मिळत असतं. शिवाय घरचाच फास्ट फूडचा व्यवसाय असल्याने तिथेही खायला मिळते. त्यामुळे खाण्यावरचे पैसे बऱयापैकी वाचतात. त्यामुळे बचतही पुरेशी होते आणि शैक्षणिक गरजा पूर्ण करतो.

नीतेश भालेराव, आयएचएम कॅटरिंग कॉलेज

नियोजन नसल्याने पुरत नाही

पॉकेटमनी मला पुरत नाही. पूर्ण महिना हा पॉकेटमनी चालवणे थोडे कठीण होते. महिन्याच्या सुरुवातीला पैसे हातात असल्याने मैत्रिणींसोबत पार्टी, बाहेर फिरायला जाणे वगैरे होते. पण महिन्याच्या अखेरीपर्यंत हातात तुटपुंजे पैसे उरतात आणि तेव्हा मग काटकसर सुरू होते. काही खर्च पुढच्या महिन्यात करू आणि पुढचे काही दिवस ओढून ताणून चालवले जातात. कधी पैसे लवकर संपले तर आईकडे पुन्हा मागावे लागतात तर कधी दादाकडून गुपचूप पैसे घेते. त्यामुळे पैसे वाचत नव्हते. मग मी सुरुवातीलाच दिलेल्या पॉकिटमनीमधून काही पैसे आईकडे ठेवायला लागले. त्यामुळे पैसे संपले की पुन्हा आईकडे मागायला काहीच वाटायचे नाही. तीही ते लगेच द्यायची. त्यातून काही उरले तर पुढच्या महिन्यात त्याचा उपयोग होतो.

दीक्षिता कोडग, महात्मा फुले एज्यु. सोसायटी

आपली प्रतिक्रिया द्या