पुण्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच; नऱ्हेत तरुणाने घेतला गळफास

पुणे शहरात आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. गुरुवारी कोथरूडनंतर नऱ्हेत तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यश शिवाजी खोपडे (वय 20, रा. नर्हे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिहंगड रोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याला पेंटिंग करण्याचा छंद होता. त्याच्या मित्रांनी नऱ्हेत एक रूम भाड्याने घेतली होती. त्याठिकाणी ते राहत होते. बुधवारी रात्री उशीरा यश फ्लॅटवर आला होता. गुरुवारी सकाळी त्याच्या मित्रांनी दार वाजवले. पण यशने दार उघडले नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला असता, यशने आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर मित्रांनी ही माहिती सिहंगड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास सिहंगड रोड पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या