60 हजारांच्या फोनवर बोलणं पडलं महागात, दुचाकीस्वारांनी हिसकावला फोन

महागडा फोन घेऊन रस्त्यावर चालता चालता बोलणं एका तरुणाला महागात पडलं आहे. मोबाइलवर बोलत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तरूणाच्या हातातील 60 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला आहे.

ही घटना 25 जुलैला संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास खराडीतील गंगा कॉन्स्टेला इमारतीसमोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी गोवर्धन मानम (वय 26, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर्धन एका खासगी कंपनीत कामाला असून काल संध्याकाळी सातच्या सुमारास ते मोबालवर बोलत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी जबरदस्तीने त्यांच्या हातातील 60 हजारांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. गोवर्धन यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी चंदननगर पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या