Video – प्रसिद्धीसाठी रस्त्यावर उडवायचा पैसे, पोलिसांकडून गुन्हा दाखल

सोशल मीडियाच्या जमान्यात प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. प्रसिद्धीसाठी एक युट्युबर असाच भर रस्त्यावर पैसे उडवायचा. हे पैसे जमा करायला लोक गोळा व्हायचे आणि त्यामुळे एकच गोंधळ व्हायचा. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.

हैद्राबादमध्ये एक तरुण बाईकरून पैसे उधळायचा, ते सुद्धा गर्दीच्या ठिकाणी यामुळे हे पैसे गोळा करायला लोकांची एकच झुंबड उडायची आणि गदारोळ माजायचा. हा तरुण युट्युबर असून त्याचे इन्स्टाग्रामवरही पेज आहे. त्याचे तीन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यापैकी पहिल्या व्हिडीओमध्ये हा तरुणी बाईकवर बसून बाजारात पैसे उधळतो. त्यानंतर बाजारात आलेले लोक हे पैसे घ्यायला गर्दी करतात. दुसऱ्या व्हिडीओमध्ये भररस्त्यात हा तरुणी पैसे फेकतो, लोक पैसे गोळा करायला गर्दी करतता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Sudhakar Udumula यांनी हे तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. आणि पोलिसांकडे सविस्तर तक्रार केली आहे. यावर कारवाई करणार का असा सवालही त्यांनी विचारला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचेही आश्वासन दिले आहे.