युवा सैनिकांनी घेतली शेतकऱ्यांची भेट , सरसकट नुकसान भरपाईची मागणी

723

परतीच्या पावसाने  झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी युवासेनेने नायब तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आमदार आदित्य  ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासैनिकांनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील सुलेमान देवळा व हिवरा गावामधे अवकाळी पावसाने  नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच  शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी तहसीलदार यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा केला.

परतीच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाती आलेले पिक वाया गेल्याने शेतकऱ्यांवर संकट आले आहे. कापूस, तुर,ज्वारी, कांदा यासह कडधान्याचे प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.तालुक्यात 177 गावे असून 95 हजार 977 हेक्टर पिकक्षेत्र आहे. तालुक्यात 56 हजार 160 हेक्टर बाधित क्षेत्र असून 141 गावातील 40 हजार 435 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यामध्ये सुरू असलेली नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी मुंबई येथील युवासेनेने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

यावेळी  युवासेना कार्यकारी सदस्य साईनाथ दुर्गे, विपुल पिंगळे, रोहित खैरे, सचिन तोडकर,मंगेश रणदिवे, कुलदीप चनपे, गणेश नवगण, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटे,तालुकाप्रमुख कुमार शेळके,उपतालुका प्रमुख अक्षय सापते, शहरप्रमुख महेश धोंडे,  दीपक डहाळे, महेश एकशिंगे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

तालुका  माहिती

एकूण पीक क्षेत्र – 95977

बाधित क्षेत्र  –  56160

एकूण गावे – 177

तलाठी सजे- 45

पंचनामा करण्यासाठी नियुक्त कर्मचारी

तलाठी – 25

ग्रामसेवक- 64

कृषिसहायक -46

 

आपली प्रतिक्रिया द्या