युवराजने लाईव्ह सेशनमध्ये चहलवर केली जातीवाचक टीका, होऊ शकते अटक

1805

टीम इंडियाचा माजी स्फोटक अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने एका लाईव्ह कार्यक्रमात यजुवेंद्र चहलवर जातीवाचक टीका केली आहे. या प्रकरणी हिसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी युवराजविरोधात नाराजी व्यक्त करत माफी मागण्याची मागणी केली. त्यानंतर युवराजने देखील माफी मागणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

इंस्टाग्रामवर रोहित शर्मा सोबत लाईव्ह चॅट करत असताना युवराजने चहलच्या टिकटॉक व्हिडीओवर प्रतिक्रीया देताना जातीवाचक टीका केली. त्यानंतर सोशल मीडियावर युवराज सिंग माफी मांगो हे ट्रेंड होऊ लागले. दरम्यान हरयाणातील हिसार येथे एका व्यक्तीने पोलिसांत युवराजविरोधात तक्रार दाखल करत त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकारानंतर युवराजने एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.

‘मला हे स्पष्ट करायचे आहे की मी रंग, जात, पंथ, लिंग यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही. मी कायम लोकांच्या भल्यासाठी काम करत आलो आहे व यापुढेही करत राहिन. मी प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करतो. मी माझ्या मित्रांसोबत बोलत असताना मी केलेल्या एका वक्तव्याबाबत गैरसमज निर्माण झाला आहे. जो चुकीचा आहे. पण तरिही मी एक जबाबदार हिंदुस्थानी नागरिक असल्याने जर मी कुणालाही नकळतपणे दुखावले असेल तर मी त्यासाठी माफी मागतो. माझं माझ्या देशावर व देशवासियांवर कायम प्रेम राहिल.’, अशी पोस्ट युवराजने शेअर केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या