अविस्मरणीय दिवस! 15 वर्षांपूर्वी युवराजने ब्रॉडचे वाजवले होते बारा, सलग 6 चेंडूवर खेचले षटकार

yuvraj-singh

19 सप्टेंबर 2007, बरोबर 15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी टीम इंडियाचा क्रिकेटपटू युवराज सिंगने इतिहास घडवला होता. दक्षिण आफ्रिकेत खेळताना टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सलग 6 चेंडूवर 6 षटकार खेचले होते. तसेच फक्त 12 चेंडूत अर्धशतक झळकावले आणि विक्रम केला होता.

टीम इंडिया 18 व्या षटकाला सामोरी जात होती. फ्लिंटॉफ गोलंदाजी करत होता. युवराज आणि फ्लिंटॉफमध्ये बाचाबाची झाली. फ्लिंटॉफने युवराजकडे पाहून काही हातवारे केले होते. त्यामुळे युवराज संतापला होता. त्यानंतर 19 वं षटक टाकतांना स्टुअर्ट ब्रॉडला त्याचा फटका बसला. कारण युवाराजने फ्लिंटॉफवरच्या रागाचे उत्तर आपल्या खेळीतून दिलं. सहा चेंडूवर सहा षटकार खेचत त्याने विक्रम केला.

दुसऱ्या बाजूला तत्कालीन कर्णधार धोनी युवीचा खेळ शांतपणे पाहात आनंद घेत होता. टीम इंडियाने या सामन्यात 218 धावा केल्या होत्या. त्यानंतर खेळणाऱ्या इंग्लंडचा 18 धावांमा पराभव झाला. तसेच टीम इंडियाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला.

या खेळातच युवराज सिंगने केवळ 12 चेंडूत अर्धशतक ठोकले. यामध्ये 7 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. 16 चेंडूत 58 धावा त्यांनी ठोकल्या होत्या. हा रेकॉर्ड अद्यापही कायम आहे.