फिरकीपटू युझवेंद्र चहलचा साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे ‘क्लिन बोल्ड’ करणारी तरुणी

1538

टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने आयपीएलपूर्वी चाहत्यांना खुशखबर दिली आहे. युझवेंद्र चहलचे लग्न ठरले असून सोशल मीडियावर भावी नववधूसह फोटो शेअर करत त्याने ही माहिती दिली. चहलने साखरपुडा समारंभाचे फोटो आहेर केले आहेत. साखरपुडा झाला असला तरी लग्नाच्या तारखेचा खुलासा करण्यात आलेला नाही.

चहलचा क्लिन बोल्ड करणाऱ्या तरुणीचे नाव धनश्री वर्मा असे आहे. चहलने धनश्री वर्मा सोबतच फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ‘घरच्यांसमोर आम्ही एकमेकांना होकार दिला’, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. हा फोटो शेअर होताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोण आहे धनश्री वर्मा?
धनश्री वर्मा व्यवसायाने डॉक्टर असून कोरियोग्राफर देखील आहे. लॉकडाऊन मध्ये चहल आणि धनश्री लुडो खेळतानाही दिसले होते. धनश्री वर्मा सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध असून इन्स्टाग्रामवर जवळपास 5 लाख फॉलोअर्स आहेत. नृत्याचे अनेक व्हिडीओ ती शेअर करत असते.

विराट, पंड्याने केले अभिनंदन
दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, नुकताच बाप झालेला हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, इरफान पठाण यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी चहलचे अभिनंदन केले.

आपली प्रतिक्रिया द्या