झिम्बाब्वे-अफगाणिस्तान मालिका रद्द

208

कोरोनाचा फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बसत आहे. आता झिम्बाब्वे व अफगाणिस्तान यांच्यामध्ये ऑगस्ट महिन्यात खेळवण्यात येणारी पाच सामन्यांची टी-20 मालिकाही रद्द करण्यात आली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाकडून या मालिकेसाठी सरकारकडून परवानगी मागण्यात आली होती, पण देशातील परिस्थिती अजून नियंत्रणात आली नसल्याचे देशातील क्रीडा विभागाकडून यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी हिंदुस्थान – झिम्बाब्वे यांच्यामधील झटपट मालिकाही रद्द करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या